top of page

To Be or Not To Be

Updated: Mar 23

To be or not to be that is the question जगाव की मराव हा एकच सवाल आहे.ह्या रस्त्यावरच्या गोंधळात गर्दीचा एक तुकडा होऊन जगावं बेशरम लाचार आनंदानं?का घ्यावी झेप ह्या निळ्याशार आकाशात?आणि करावा शेवट सर्वांचा एकाच प्रहाराने?अतिक्रमणांचा, खड्यांचा अन कोंडीचा. बेभान वाहनांनी जीवनाला असा डंख मारावा… की नंतर मिळू नये कोणताही क्लेम इतके चिरडून जावे..पण मग.. पण मग त्या मढ्याला पुन्हा धावू वाटले तर? तर…तर…इथेच मेख आहे. चुकीच्या कामाविरुद्ध आवाज उठवण्याचा धीर होत नाही म्हणून आम्ही गप्प बसतो. विधात्या.. तु इतका कठोर का झालास? एका बाजुला आम्ही ज्यांना निवडून दिले ते आम्हाला विसरतात आणि दुस-या बाजुला जे कायद्याची अंमलबाजवणी करतात ते पण आम्हाला विसरतात.पण मग फाटलेल्या अपेक्षेचे झेंडे घेऊन हे करुणाकरा… आम्ही सामान्यांनी कोणाच्या पायावर डोक आदळायच? कोणाच्या पायावर ?

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page