top of page

सुधारलेली वाहतूक कोंडी

काही दिवसांपूर्वीच वाहतूक कोंडी कमी झाल्याचा दावा करून जो फुगा फुगवला होता, त्याला आजच्या पावसाने टाचणी टोचवली. एकाच पावसात ही अवस्था. अजून दोन चार दिवस पाऊस पडला तर मागील काही महिन्यात रस्ते खरवडून जे डांबराचे थर दिले आहेत त्यांची गुणवत्ताही कळून येईल.

वाहतूक कोंडीमध्ये महत्त्वाचा वाटा असलेल्या सिग्नल यंत्रणेसाठी मोठ मोठे शब्दप्रयोग वापरले जातात; जसे स्मार्ट सिग्नल, AI based signal. पण खरी परिस्थिती ही आहे की इथे सिग्नल बंद पडतात, रात्रीच्या कमी गर्दीच्या वेळी असो किंवा संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी असो सिग्नल टाइमर एकच असतो. दिवसभरातील गर्दीच्या वेळेनुसार तो टाइमर वेगवेगळा हवा.

पहिल्याच पावसात रस्त्यावर पाणी साचले. रस्त्यावर साठलेल्या पाण्यामुळे वाहनांचा वेग कमी होतो. मुख्य म्हणजे, खरं तर डांबरी रस्त्यावर पाण्याचा निचरा नीट होण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूला IRC नुसार उतार देणे आवश्यक असते. पण रस्ते तसे बनवले जात नाहीत आणि त्यामुळे रस्त्यांना खड्डे पडायला सुरुवात होते. आणि मग साचलेले पाणी आणि खड्डे अपघातांना आमंत्रण देतात.

गमतीने म्हणा किंवा कसेही पण पुणे सावकाश धावणाऱ्या वाहतुकीमध्ये अव्वल स्थान लवकरच मिळवेल हे नक्की.

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page