top of page

सार्वजनिक वाहतूक (अ) व्यवस्था

Updated: Apr 3


"पुण्यात साधी बस सुरू झाली त्या वेळी 'पुण्यात कशाला हवी होती बस? इथं सायकलीवर टांग टाकली की तासाभरात नगरप्रदक्षिणा करता येते!'-म्हणणारे लोक होते. आज बसेस अपुऱ्या पडतात." हे पु. ल. देशपांडे यांचे पुरचुंडी या पुस्तकात त्यांच्या १९६८ सालच्या भाषणातील या ओळींचा संदर्भ आला आहे. त्यावरून दोन गोष्टी कळल्या, पहिली म्हणजे म्हणजे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची फार पूर्वीपासून कमतरता आहे. आजही PMPML मधून प्रवास करताना पोल्ट्री फॉर्मच्या कोंबड्यांची वाहतूक करणारी वाहने आणि माणसे कोंबून भरून धावणारी बस यामध्ये मला काही फरक वाटत नाही. कारण एवढ्या मोठ्या लोकसंख्येला वाहून नेण्यासाठी किती बसेसची आवश्यकता आहे याचा विचार कधी होत नाही.


दुसरी गोष्ट म्हणजे म्हणजे सार्वजनिक वाहतूक गरजचे नाही असे म्हणणारेही काही लोक आहेत. पूर्वी बसची गरज वाटत नव्हती आणि आता पुणे मेट्रोला पण काही लोक व्हाईट एलिफंट म्हणत आहेत. पुण्याचे नागरिक मेट्रो वापरणारच नाही असा काही लोकांचे म्हणणे आहे. खरे तर एखादी व्यवस्था सुरू केली की ती सध्याच्या पिढीसाठी नसून पुढच्या पिढीसाठी असते. आजही पुण्यात कुठे जायचं म्हटलं की लगेच गाडीवर बसून जाणे आम्हाला सोपे वाटते. त्यामुळे आमची पिढी मेट्रोचा वापर करेलच असे नाही, कारण आम्हाला तशी सवय नाही. तरीही काही भागात उपलब्ध असूनही सध्या मेट्रोला चांगला प्रतिसाद आहे.


अजून एक आवडलेलं वाक्य म्हणजे 'A developed country is not a place where the poor have cars. It’s where the rich use public transportation. - Gustavo Petro' म्हणजे काय तर सर्वजणी वाहतूक व्यवस्था इतकी सहज उपलब्ध असावी की श्रीमंत लोकही त्यातून प्रवास करतील, तरच त्या देशाला विकसित देश म्हणता येईल.


सध्या वैयक्तिक वाहनांमुळे इतकी गर्दी झाली आहे की रस्त्यावर, बसमध्ये जातायेता लोक एकमेकांबरोबर छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडतात. खरंच त्यांचा तो स्वभाव आहे म्हणून ते भांडतात का? की ते वाहतूक कोंडी, गर्दी, खराब रस्ते या गोष्टींना वैतागलेले असतात. त्यांचा तो राग खरं तर शासनाविरोधात असतो, पण तो कुठे व कसा व्यक्त करायचा हे त्यांना कळत नाही.

Commenti

Valutazione 0 stelle su 5.
Non ci sono ancora valutazioni

Aggiungi una valutazione
bottom of page