top of page

उसवलेले नशीब…

Updated: Mar 20

तसं तर सगळे मला लाडाने लालपरी म्हणतात. मी जन्मल्यापासून सर्वसामान्य जनतेची ओझी वाहत आहे. माझ्याकडेही आमदार, खासदार लोकांसाठी बसायला राखीव जागा आहेत. मी बापडी त्या राजकारण्याच्या भेटीसाठी कधीची व्याकूळ झाली आहे पण सत्तेच्या खुर्चीसाठी भांडणारे ते साहेब लोक कधीही त्या आरक्षित जागेवर बसायला आलेले मला तरी आठवत नाहीत. मी कितीही काम केले तरी माझा काही सरकारला फायदा नाही म्हणतात, मी तुडुंब भरूनही नेहमीच तोट्यात कशी असते हे मला त्यांना विचारायचं आहे. मी ज्यांना सुरक्षित प्रवास घडवते ती माझीच मुलं दंगलीत मलाच जळतात यापेक्षा मोठं दुःख काय. माझी अवस्था घरातील वर्षानुवर्षे आजारी आलेल्या दुर्लक्षित म्हातारी सारखी झाली आहे, स्वतःला सरकार म्हणवणारी मंडळी माझ्या मरणाची वाट पाहत आहे.

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page