top of page

काचेचे पुस्तक

Updated: Mar 20

माझ्या शाळेत असणाऱ्या दोन खोल्यांबाबत मला नेहमी खूप कुतूहल असायचे. एक म्हणजे ग्रंथालय आणि दुसरे संगणक कक्ष. त्यातील ग्रंथालयात जाण्याचा एकदाच योग आला. तिथे काही कपाटात भरून खूप पुस्तकं ठेवली होती. त्या वर्षानुवर्षे नव्याकोऱ्याच राहिलेल्या पुस्तकांवर शिक्के उमटविण्याची जबाबदारी जात नव्हता. कधी त्या गाभाऱ्यात जाण्याचा योग अलाच तरी संगणकाचे मुखदर्शन घेऊन समाधान मानावे लागत असे. कारण तिथे कोणत्याही गोष्टीला हात लावण्यास सक्त मनाई होती. शिक्षक जे दाखवतील ते खाली बसून आम्ही मुल बघत असू. पण आता मात्र तोच संगणक भूत बनून मानगुटीवर बसला आहे, त्याच्याकडे सतत बघत काम करावे लागते म्हणून डोळ्यांवर वेगवेगळ्या काचा चाढवाव्या लागतात. सध्या मात्र ग्रंथालयच संगणकावर उपलब्ध आहे, जगातील कोणतेही पुस्तक कोणत्याही ठिकाणी संगणकावर वा मोबाईलवर आपण वाचू शकतो हीच काय ती आनंदाची गोष्ट…

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page